RTE Admission 2025 : भारत सरकारने 2009 मध्ये RTE कायदा लागू केला आणि ही प्रवेश प्रक्रिया सुरू केली. याचा उद्देश हा गोर गरीब आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबातील मुलांना खाजगी शाळांमध्ये 25 % जागा आरक्षित करून त्यांना गुणवत्तापूर्ण शैक्षणिक संधी मिळवुन देणे हा आहे. 2025 मध्ये RTE 25% Admission प्रवेश प्रक्रिया जास्त महत्त्वाची ठरते. आरटीई अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांना याचा फायदा होतो. RTE 25% Admission 2025 बद्दल सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये बघणार आहोत.
RTE 25% Admission

Maharashtra RTE Admissions 2025
The Maharashtra RTE Admissions 2025 process has started for the academic year 2025-26. Applications are open from 14 January to 27 January 2025. Under the Right to Education (RTE) Act, 25% of seats in private and unaided schools are reserved for economically weaker and disadvantaged students. Parents can apply online through the official portal Let us know RTE 25% Admission 2025 in marathi.
RTE 25% Admission 2025 थोडक्यात माहिती
आरटीई म्हणजेच शिक्षणाचा अधिकार कायदा 2009 मध्ये मंजूर झाला. या कायद्यांतर्गत आर्थिक दुर्बल आणि वंचित कुटुंबातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश दिला जातो. महाराष्ट्रात 2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आरटीई अंतर्गत खासगी शाळांमध्ये 25% जागा राखीव ठेवण्यात येतात. पात्र विद्यार्थ्यांची नोंदणी 13 जानेवारी ते 27 जानेवारी 2025 दरम्यान केली जाईल. या प्रवेश प्रक्रियेत, गरीब कुटुंबातील मुलांना नामांकित खासगी शाळांमध्ये प्रवेश घेण्याची संधी मिळते. आरटीई अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना खासगी शाळेत प्रवेश मिळण्यासाठीची प्रक्रिया राज्य सरकारद्वारे ऑनलाइन राबवली जाते. आरटीई नियमांनुसार, प्रत्येक वर्गात 25% जागा राखीव ठेवण्यात येतात आणि त्यावर पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
RTE Admission 2025-26 Maharashtra साठी पात्रता
- आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबातील विध्यार्थी ज्यांचे वय हे 4.5 ते 7.5 वर्षापर्यंत असावे.
- विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाखांपेक्षा कमी असावे.
- अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय (OBC), आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबे असलेले विद्यार्थी.
RTE 25% Admission अर्ज निवड पद्धत
- प्राप्त अर्जांची निवड ऑनलाइन लॉटरी पद्धतीने होते.
- अर्ज करत असलेल्या शाळेपासून जास्त जवळ असणाऱ्या अर्जांची निवड होण्याची शक्यता जास्त असते.
Maharashtra RTE Admissions 2025 प्रवेश वर्गानुसार वयोमार्यादा
प्रवेश वर्ग | किमान वयोमार्यादा | कमाल वयोमार्यादा |
प्ले ग्रुप / नर्सरी | 3 वर्ष | 4 वर्ष 5 महिने 30 दिवस |
ज्युनियर केजी | 4 वर्ष | 5 वर्ष 5 महिने 30 दिवस |
सिनियर केजी | 5 वर्ष | 6 वर्ष 5 महिने 30 दिवस |
इयत्ता १ ली | 6 वर्ष | 7 वर्ष 5 महिने 30 दिवस |
RTE 25% Admission 2025 अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- जात प्रमाणपत्र
- उत्पन्न प्रमाणपत्र
- विद्यार्थ्याचा जन्म दाखला
- डोमीसाईल
- विद्यार्थी अपंग असल्यास त्याचे प्रमाणपत्र
- इतर संबधित कागदपत्रे
RTE 25% Admission 2025 Apply Online Link
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
मुळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अर्ज भरण्यासाठी लिंक | येथे क्लिक करा |
How To Apply RTE 25% Admission 2025
- सर्वप्रथम वरील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून official पोर्टल वरती जा.
- त्यानंतर पोर्टल वरती रजिस्ट्रेशन करून घ्या व log in करा.
- विद्यार्थी आणि पालकांची माहिती, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, वयोमर्यादा, जात प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक माहिती भरा.
- अर्ज करत असताना घरापासून जास्त जवळ असणाऱ्या शाळा निवडाव्या.
- आवश्यक ती कागदपत्रे (आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, आणि इतर) अपलोड करा.
- अर्ज सबमीट करा आणि अर्ज सबमिट केल्यानंतर आलेली पावती जपून ठेवा.
अर्ज करताना पालकांनी घ्यायची काळजी
- अर्ज भरताना पत्ता हा Google location वरती बघून भरा.
- जन्म दाखल्यावरचाच जन्म तारीख भरा. एकदा भरलेली जन्म तारीख बदलता येणार नाही.
- 1 किमी, 1 ते 3 किमी अंतरावर 10 शाळा निवडा.
- अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा.
- अर्ज चुकल्यास, पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करा आणि नवीन अर्ज भरा.
- डुप्लिकेट अर्ज भरू नका. 2 अर्ज आढळल्यास, दोन्ही अर्ज बाद होतील.
- अर्ज भरल्यानंतर अर्ज क्रमांक, मोबाइल नंबर, आणि अर्जाची प्रत जपून ठेवा.
- खोटी किंवा चुकीची माहिती आढळल्यास प्रवेश रद्द होईल.
- पासवर्ड विसरल्यास, Recover Password वरती क्लिक करून रिसेट करा.
- RTE 25% प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जानेवारी 2025 आहे.
- दिव्यांग बालकांसाठी 40% किंवा त्याहून अधिक दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र आवश्यक.
- निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द, बँकेचे पासबुक आवश्यक (राष्ट्रीय बँक).
- Location चुकू नये म्हणून Google Maps वर पत्ता आणि Latitude, Longitude बघून अर्जात भरा.
Conclusion : निष्कर्ष
महाराष्ट्र आरटीई प्रवेश प्रक्रिया 2025 शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी अर्ज सुरू झाले आहेत. अर्ज 14 जानेवारी 2025 पासून 27 जानेवारी 2025 पर्यंत भरू शकता. शिक्षणाचा अधिकार (RTE) अधिनियम अंतर्गत, खासगी शाळांमध्ये 25% जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. पालक अधिकृत पोर्टलवरून ऑनलाइन अर्ज करू शकतात. ही माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद ..!
RTE 25% Admission 2025 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख किती आहे ?
RTE 25% Admission 2025 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 27 जानेवारी 2025 आहे.
RTE 25% Admission अर्जाची निवड कशी केली जाते ?
प्राप्त अर्जांची निवड ऑनलाइन लॉटरी पद्धतीने होते. अर्ज करत असलेल्या शाळेपासून जास्त जवळ असणाऱ्या अर्जांची निवड होण्याची शक्यता जास्त असते.