Magel Tyala Solar Pump Yojana 2025 : मागेल त्याला सोलार पंप योजना

Magel Tyala Solar Pump Yojana 2025 : मागेल त्याला सोलार पंप योजना ही महाराष्ट्र शासनाची अशी योजना आहे की या योजनेंतर्गत, शेतकऱ्यांना कमी खर्चात सोलार पॅनेल आणि कृषी पंप दिले जातील. यामुळे विजेच्या तुटवड्यातही शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी पाण्याचा वापर करता येईल आणि उत्पन्न वाढवता येईल. तसेच शेतकर्‍यांना दिवसा विज पुरवठा विनाखंडीत होईल. मागेल त्याला सोलार पंप योजना चा अर्ज कसा करायचा कुठे करायचा यामध्ये आपण बघणार आहोत. तसेच अर्ज करण्यासाठी कागदपत्रे काय लागतील, याची सविस्तर माहिती आपण आज पाहणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Solar Pump Yojana Maharashtra

Magel Tyala Solar Pump Yojana 2025

Solar Pump Yojana Maharashtra

magel tyala solar pump yojana, solar pump yojana, maharashtra solar pump yojana online application, maharashtra solar pump yojana online application status, msedcl solar application form, solar application status check, solar subsidy status check, Solar Pump Yojana Maharashtra online apply.

योजनेचे नावमागेल त्याला सोलार पंप योजना
कोणी सुरुवात केलीमहाराष्ट्र शासन
चालू वर्ष2025
लाभार्थीमहाराष्ट्रातील शेतकरी
उद्देशशेतकऱ्यांना कमी खर्चात सिंचनासाठी शाश्वत आणि स्वतंत्र पाणीपुरवठा साधन उपलब्ध करून देणे
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन

Magel Tyala Solar Pump योजनेबद्दल थोडक्यात माहिती

भारताच्या वीज निर्मितीत अजूनही कोळशाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. विजेच्या तुटवड्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. काही शेतकऱ्यांकडे पाणी असले तरी विजेअभावी ते पाण्याचा उपयोग करू शकत नाहीत, ज्यामुळे उत्पन्न कमी होते.म्हणून महाराष्ट्र शासनाने “मागेल त्याला सोलार पंप” योजना सुरू केली आहे. या योजनेत 3 एचपी, 5 एचपी, आणि 7.5 एचपी सोलार पंप शेतकऱ्यांना दिले जातात. सर्वसाधारण गटासाठी 10% आणि अनुसूचित जाती-जमातींसाठी 5% रक्कम भरून या योजनेचा लाभ घेता येतो.या योजनेमुळे विजेच्या तुटवड्यातही शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी पाण्याचा वापर करता येतो, ज्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढते.

Magel Tyala Solar Pump योजनेची ठळक वैशिष्टे

  • शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना
  • सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ १० टक्के रक्कम भरून सौर पॅनेल्स व कृषी पंपाचा पूर्ण संच
  • अनुसूचित जाती – जमातींच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा ५ टक्के
  • उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान
  • जमिनीच्या क्षेत्रानुसार ३ ते ७.५ एचपीचे पंप
  • पाच वर्षांची दुरुस्ती हमी, इन्शुरन्स सह
  • वीजबिल नाही, लोडशेडिंगची चिंता नाही
  • सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा

Magel Tyala Solar Pump योजनेच्या लाभासाठी पात्रता

  • अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • अर्जदाराने आधी कोणत्याही सौर पंपाचा फायदा घेतलेला नसावा.
  • अर्जदाराकडे स्वतःच्या नावे किंवा भागीदारीत जमीन असावी.
  • सामायिक जमिनीच्या बाबतीत, सर्व भोगवाटेदारांची संमती पत्र असणे आवश्यक आहे.
  • वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहिर, बोअरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी/नाले यांच्या शेजारील शेतजमीनधारक शेतकरी सुध्दा या योजनेसाठी पात्र राहतील.
  • ज्या शेतकऱ्यांकडे बोअरवेल, विहिर व नदी इ. ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्त्रोत आहे याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल. तथापि, जलसंधारण कामाच्या पाणी जिरविण्याच्या पाणीसाठ्यामधून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाहीत.
  • अटल सौर कृषी पंप योजना-१, अटल सौर कृषी पंप योजना-२ व मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना या योजनांचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या अभियानांतर्गत लाभास पात्र असतील.

Solar Pump Yojana जमिनीच्या क्षेत्रानुसार दिले जाणारे पंप

अश्वशक्ती क्षमता (HP)जमिनीचे क्षेत्र
3 HP2.5 एकरापर्यंत
5 HP2.51 एकर ते 5 एकरापर्यंत
7.5 HP5 एकरा पेक्षा जास्त

Magel Tyala Krushi Pump लाभार्थ्यांनी भरायचा हिस्सा

अश्वशक्ती क्षमता (HP)SC / ST
प्रवर्गांनी भरायची रक्कम
(5 % रक्कम
)
इतर प्रवर्गांनी भरायची रक्कम
(10 % रक्कम)
3 HP11486/-22971/-
5 HP16038/-32075/-
7.5 HP22464/-44928/-

अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • जातीचे प्रमाणपत्र (अनुसुचित जाती/ जमाती लाभार्थींसाठी
  • पासपोर्ट साईज फोटो
  • 7/12 उताऱ्यावर विहिर किंवा कुपनलिका नोंद आवश्यक
  • सामाईक क्षेत्र असल्यास इतर हिस्सेदारांचा / मालकांचा ना हरकत दाखला
  • पाण्याचा स्त्रोत डार्क झोन मध्ये असल्यास भुजल सर्वेक्षण विभागातर्फे ना हरकत प्रमाणपत्र

Magel Tyala Solar Pump Yojana Apply Online

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
मुळ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अर्जाची स्थिती तपासणेयेथे क्लिक करा
लाभार्थी हिस्सा रक्कम भरणेयेथे क्लिक करा

अर्ज करताना घ्यायची काळजी

  • अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात (GR) नीट वाचुन पहा.
  • तुमची लाभार्थी पात्रता GR नुसार आहे का तपासा.
  • अचूक आणि खरी माहिती भरा आणि आवश्यकतेनुसार सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • अर्ज योग्य पद्धतीने भरा आणि पावती जपून ठेवा.
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी आपण भरलेली सर्व माहिती बरोबर आहे का परत एकदा तपासा.

Conclusion : निष्कर्ष

Magel Tyala Solar Pump Yojana 2025 योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना कमी खर्चात सौर पंप देऊन सिंचनासाठी पाणी पुरवण्याचे आहे. यामुळे विजेच्या तुटवड्यातही शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी पाण्याचा वापर करता येतो, आणि उत्पन्न वाढवता येते. या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा, विमा आणि दुरुस्तीची हमी मिळते, जे त्यांच्या भविष्याच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण आहे.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना काय आहे ?

ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्त्रोत आहे व ज्या शेतकऱ्यांकडे शेतीच्या सिंचनाकरीता पारंपारिक पध्दतीने विजपुरवठा नाही, अशा शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यात सौर कृषीपंप आस्थापित करण्यात येणार आहेत.

मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा फायदा कोणाला मिळणार आहे ?

ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्त्रोत आहे व ज्या ठिकाणी यापूर्वी पारंपारिक कृषीपंपाकरीता वीजपुरवठा देण्यात आला नाही, अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. महावितरणकडे पैसे भरुन प्रलंबित असलेल्या शेतक-यांना प्राधान्य देण्यात येईल.

सौर कृषीपंप म्हणजे काय ?

सौर कृषीपंप हा सुर्याच्या किरणांपासून म्हणजेच सौर ऊर्जेपासुन चालणारा पंप आहे. सौर पंपामध्ये मुख्यत: सोलर पॅनल, वॉटर पंप संच, पंप नियंत्रण उपकरणे तसेच इतर आवश्यक साहित्याचा समावेश आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

RRB Group D Bharti 2025