MHT CET 2025 : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सविस्तर माहिती

MHT CET 2025 : MHT CET म्हणजे महाराष्ट्र कॉमन एंट्रन्स टेस्ट 2025, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी, आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठो घेतली जाणारी एक अतिशय महत्वाची परीक्षा आहे. कारण ती महाराष्ट्रातील विध्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने एक आधारभूत परीक्षा आहे. या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेता येतो. या परीक्षेसाठी लागणारी सर्व आवश्यक माहीती जसे की अर्ज करण्याची पद्धत, परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम इ. माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

MHT CET 2025 Registration

MHT CET 2025

MHT CET 2025 Information

MHT CET 2025 stands for Maharashtra Common Entrance Test 2025. This exam is conducted by the Maharashtra government for admission to various professional courses like Engineering, Medical, Pharmacy, and others. It is an important exam for students in Maharashtra as it serves as a gateway to their future careers. Let us Know About MHT CET 2025 Information In Marathi.

MHT CET Exam Pattern 2025 Highlights – परीक्षेचे स्वरूप

परीक्षेचा पद्धतComputer Based Test
आयोजक संस्थाState Common Entrance Test Cell Of Maharashtra
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
ऑनलाईन अर्जासाठी शेवटची तारीख15 फेब्रुवारी 2025 
विभागविभाग 1 – भौतिकशास्त्र (Physics)
रसायनशास्त्र (Chemistry)
विभाग 2 – गणित (Mathematics)
परीक्षा कालावधी180 मिनिटे
( प्रतेक विभागासाठी 90 मिनिटे )
प्रश्नांचा प्रकारMultiple Choice Questions
एकुण प्रश्न150 प्रश्न
( 50 प्रश्न प्रत्येक विषयासाठी )
एकुण मार्क (PCM)200 मार्क्स
( 100 मार्क प्रत्येक विभागासाठी )
परीक्षेची भाषागणित (Mathematics) – इंग्रजी
भौतिकशास्त्र (Physics) आणि
रसायनशास्त्र (Chemistry) – मराठी, हिंदी, इंग्रजी.
चुकीच्या उत्तरांसाठी गुण कमीचुकीच्या उत्तरांसाठी गुण कमी केले जाणार नाहीत.
परीक्षा तारीखPCM – 11 एप्रिल ते 27 एप्रिल 2025
PCB – 9 एप्रिल ते 17 एप्रिल 2025
( वरील तारखा ह्या Tentative स्वरुपाच्या असतील )

MHT CET 2025 Syllabus : अभ्यासक्रम

MHT CET Physics Syllabus

11 वी12 वी
मापन (Measurements),
दिशात्मकता आणि अदिश
(Scalars and Vectors),
बल (Force),
घन आणि द्रवांमध्ये घर्षण
(Friction in solids and liquids),
प्रकाशाचा अपवर्तन (Refraction of Light),
किरण प्रकाशिकी (Ray optics),
विद्युत प्रवाहाचा चुंबकीय परिणाम
(Magnetic effect of electric current),
चुंबकत्व (Magnetism).
वर्तुळाकार गती (Circular motion),
घूर्णन गती (Rotational motion),
दोलायमानता (Oscillations),
गुरुत्वाकर्षण (Gravitation),
लवचिकता (Elasticity),
विद्युतस्थिर (Electrostatics),
तरंग गती (Wave Motion),
चुंबकत्व (Magnetism),
पृष्ठ ताण (Surface Tension),
प्रकाशाची तरंग सिद्धांत
(Wave Theory of Light),
स्थिर तरंग (Stationary Waves),
वायूंची गतिक सिद्धांत आणि किरणोत्सर्ग
(Kinetic Theory of Gases and Radiation),
हस्तक्षेप आणि विचलन
(Interference and Diffraction),
विद्युत प्रवाह (Current Electricity),
विद्युत प्रवाहाचा चुंबकीय परिणाम
(Magnetic Effects of Electric Current),
विद्युतचुंबकीय प्रेरणे
(Electromagnetic Inductions),
विद्युत आणि फोटॉन्स
(Electrons and Photons),
अणू (Atoms),
आण्विक (Molecules),
नाभिक (Nuclei),
अर्धचालक (Semiconductors),
संपर्क प्रणाली (Communication Systems).

MHT CET Chemistry Syllabus

11 वी12 वी
रसायनशास्त्रातील काही मूलभूत संकल्पना (Some basic concepts of chemistry),
पदार्थाच्या अवस्था: वायू आणि द्रव
(States of matter: Gasses and liquids),
रेडॉक्स अभिक्रिया (Redox reaction),
पृष्ठ रसायनशास्त्र (Surface chemistry),
रासायनिक बंधाची प्रकृती
(Nature of chemical bond),
हायड्रोजन (Hydrogen),
s-ब्लॉक घटक (सोडियम आणि क्षार धातू)
(s-Block elements – Alkali and alkaline earth metals),
सेंद्रिय रसायनशास्त्रातील मूलभूत संकल्पना आणि पद्धती
(Fundamental concepts and methods in organic chemistry),
अल्केन्स (Alkanes).
घन अवस्था (Solid State),
रासायनिक उष्मागतिकी आणि ऊर्जागतिकी (Chemical Thermodynamics and Energetic),
विद्युतरसायनशास्त्र (Electrochemistry),
सामान्य तत्त्वे आणि पृथक्करणाच्या प्रक्रिया (General Principles and Processes of Isolation),
द्रावणे आणि संग्रहिलक गुणधर्म
(Solutions and Colligative Properties),
p-ब्लॉक घटक (p-Block elements),
समूह 15 घटक (Group 15 elements),
d आणि f ब्लॉक घटक
(d and f Block Elements),
रासायनिक गतिकी (Chemical Kinetics),
समन्वय संयुगे
(Coordination Compounds),
अल्केन्सचे हॅलोजन डेरिव्हेटिव्हज आणि ऍरेन (Halogen Derivatives of Alkanes – and arenes),
ऍल्डिहाईड्स (Aldehydes),
कीटोन आणि कार्बोक्झिलिक आम्ल
(Ketones and Carboxylic Acids),
नायट्रोजन असलेली सेंद्रिय संयुगे
(Organic Compounds Containing Nitrogen),
अल्कोहोल (Alcohols),
फिनॉल्स आणि ईथर अल्कोहोल
(Phenols and Ether Alcohol),
पॉलिमर (Polymers),
दैनंदिन जीवनातील रसायनशास्त्र
(Chemistry in Everyday Life),
बायोमॉलेक्यूल्स – कार्बोहायड्रेट्स (Biomolecules – Carbohydrates).

MHT CET Mathematics Syllabus

11 वी12 वी
त्रिकोणमितीय फंक्शन्स
(Trigonometric functions),
संयुगे कोनांच्या त्रिकोणमितीय फंक्शन्स (Trigonometric functions of Compound Angles),
घटककरण सूत्रे
(Factorization Formulae),
सरळ रेषा (Straight Line),
वर्तुळ आणि शांकव (Circle and Conics),
समुच्चये (Sets),
संबंध आणि फंक्शन्स
(Relations and Functions),
संभाव्यता (Probability),
क्रम आणि श्रेणी (Sequences and Series).
गणितीय तर्कशास्त्र
(Mathematical Logic),
मॅट्रिसेस (Matrices),
त्रिकोणमितीय फंक्शन्स
(Trigonometric functions),
जोडीच्या सरळ रेषा
(Pair of straight lines),
वर्तुळ (Circle),
शांकव (Conics),
वेक्टर (Vectors),
त्रिमितीय भूमिती
(Three-dimensional geometry),
रेषा (Line),
तल (Plane),
रेषीय प्रोग्रामिंग समस्या
(Linear programming problems),
सातत्य (Continuity),
विकलन (Differentiation),
विकलनाच्या अनुप्रयोग
(Applications of derivative),
समाकलन (Integration),
निश्चित समाकलनाचे अनुप्रयोग
(Applications of definite integral),
सांख्यिकी (Statistics),
संभाव्यता वितरण
(Probability distribution).

MHT CET Biology & Zoology Syllabus

11 वी12 वी
कोशिकेचे जैव रसायनशास्त्र
(Biochemistry of cell),
सजीवांमध्ये विविधता
(Diversity in organisms),
वनस्पतींची वाढ आणि विकास
(Plant Growth and Development),
वनस्पती जलसंबंध आणि खनिज पोषण
(Plant Water Relations and Mineral Nutrition),
कोशिकेचे संघटन (Organization of Cell),
प्राण्यांचे ऊतक (Animal tissues),
मानव पोषण (Human Nutrition),
मानव श्वसन (Human Respiration).
अनुवांशिकतेचा आधार
(Genetic Basis of Inheritance),
जीन्स: त्याची प्रकृती (Gene: its nature),
व्यक्त आणि नियमन
(Expression and regulation),
जैवतंत्रज्ञान: प्रक्रिया आणि अनुप्रयोग (Biotechnology: Process and Application),
अन्न उत्पादनात वाढ
(Enhancement in Food Production),
मानव कल्याणात सूक्ष्मजीव
(Microbes in Human Welfare),
प्रकाशसंश्लेषण (Photosynthesis),
श्वसन (Respiration),
वनस्पतींची पुनरुत्पत्ती
(Reproduction in Plants),
सजीव आणि पर्यावरण – II
(Organisms and Environment – II),
जीवनाची उत्पत्ती आणि उत्क्रांती
(Origin and the Evolution of Life),
अनुवांशिकतेचा गुणसूत्रीय आधार (Chromosomal Basis of Inheritance),
जैव अभियांत्रिकी आणि जीनोमिक्स
(Genetic Engineering and Genomics),
मानव आरोग्य आणि रोग
(Human Health and Diseases),
पशुपालन (Animal Husbandry),
रक्तसंचालन (Circulation),
उत्सर्जन आणि परासरण नियमन
(Excretion and osmoregulation),
नियंत्रण आणि समन्वय
(Control and Coordination),
मानवी पुनरुत्पत्ती
(Human Reproduction),
सजीव आणि पर्यावरण-II
(Organisms and Environment-II)

MHT CET 2025 Registration Documents Required : आवश्यक कागदपत्रे

  • 10 वी / 12 वी मार्कशीट
  • आधार कार्ड / पॅन कार्ड
  • जातीचा दाखला
  • वय आणि राष्ट्रीयत्वाचा दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो ( शक्य तो बॅकग्राऊंड पांढरे असावे )
  • सही ( शक्य तो काळ्या पेनाने केलेली असावी )
  • अपंग असाल तर त्याचा दाखला
  • इतर आसंबंधित कागदपत्रे

MHT CET 2025 Registration Link

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
मुळ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करताना घ्यायची काळजी

  • अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात नीट वाचुन पहा.
  • तुमची शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा जाहिरातीनुसार आहे का ते तपासा.
  • अचूक आणि खरी माहिती भरा आणि आवश्यकतेनुसार सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • फी भरताना योग्य पद्धतीने भरा आणि पावती जपून ठेवा.
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी आपण भरलेली सर्व माहिती बरोबर आहे का परत एकदा तपासा.

अभ्यास करताना असे करा नियोजन

  • नियमित वेळापत्रक तयार करून अभ्यास करा.
  • वेळोवेळी मॉक टेस्ट देऊन तयारी करा.
  • मित्रांसह समूहात अभ्यास करा.
  • शिक्षकांचे मार्गदर्शन आणि अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या.
  • अभ्यास करताना वेळेचे नियोजन करा.
  • दररोज नियमितपणे अभ्यास करा.
  • आठवड्याला अभ्यासाचे रीविजन करा.
  • मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवा.

Conclusion : निष्कर्ष

MHT CET 2025 ही विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी महत्त्वपूर्ण परीक्षा आहे. योग्य तयारी आपल्याला यश मिळू शकते. सर्व विद्यार्थ्यांनी तयारी करून उत्तम गुण मिळवावेत. तयारीला लागा आणि आत्मविश्वासाने पुढे चला.
सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा!

MHT CET 2025 परीक्षेसाठी अर्ज करण्याची पद्धत कशी आहे ?

MHT CET 2025 परीक्षेसाठी अर्ज हे ऑनलाईन करायचे आहेत.

MHT CET 2025 परीक्षा कोण घेते ?

State Common Entrance Test Cell Of Maharashtra ही संस्था MHT CET 2025 परीक्षा घेते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

RRB Group D Bharti 2025